PMPML : पीएमपीएमएलकडून 3 बस मार्ग खंडीत

एमपीसी न्यूज – प्रवाश्यांची संख्या व रहदारी पाहता पीएमपीएमएलतर्फे (PMPML) तीन मार्ग खंडीत करण्यात आले असून 6 शेड्यूलची वाढ कऱण्यात आली आहे. हा बदल बुधवार (दि.11) पासून करण्यात येणार आहे.

बस मार्ग क्र. 42 कात्रज ते निगडी, भक्ती शक्ती या मार्गावरती 6 शेड्यूलची वाढ मार्ग क्र.229 मुकाई चौक ते वडगांव मावळ या मार्गावर खेपामध्ये वाढ करण्यात आली आहे. सध्या परिवहन महामंडळाकडुन संचलनात असलेले बस मार्ग क्र.12, 208 व 228 या मार्गावर महामेट्रोच्या कामकाजामुळे मुख्य रस्त्यावर खाजगी वाहनांची वाढलेली संख्या पाहता होणारी वाहतुक कोंडीमुळे नियोजित खेपा होत नाहीत.

यात नागरिकांची गैरसोय होऊन वेळेत बसेस उपलब्ध होत नसल्यामुळे महामंडळाकडून प्रवासी नागरिकांना अधिक वारंवारीतेने बसेस उपलब्ध होण्यासाठी लांब पल्ल्याचे तीन बस मार्ग मुख्य स्थानका पर्यंत खंडीत करण्यात येत आहेत. तर बस मार्ग क्र. 42 कात्रज ते निगडी, भक्ती शक्ती या मार्गावरती 6 शेड्युलची वाढ करण्यात येणा आहे.

Bjp : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर

खंडित बस मार्ग पुढील प्रमाणे…

1. बस मार्ग क्र.12 अप्पर डेपो ते निगडी हा बस मार्ग शिवाजीनगर पर्यंत खंडीत करून खेपामध्ये वाढ करण्यात आली. असून या मार्गावर सरासरी 10 मी. वारंवारीतेने बसेस उपलब्ध केलेल्या आहेत.

2. बस मार्ग क्र.208 भेकराईनगर ते हिंजवडी माण फेज 3 या मार्गावर 12 शेड्युल पैकी 6 शेड्युल खंडीत केले आहेत. क्र. 208 (अ) भेकराईनगर ते म.न.पा. भवन पर्यंत करण्यात आला असून 25 मी. वारंवारीतेचे ने बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तर बाकी 6 शेड्युलला भेकराईनगर ते हिंजवडी माण फेज 3 अशा नियमित खेपा देण्यात आल्या असून बसेसच्या सरासरी 1 तास वारंवारीते ने बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.

3. बस मार्ग क्र.228 कात्रज ते वडगांव मावळ हा बस मार्ग मुकाई चौका पर्यंत खंडीत करून खेपामध्ये वाढ करण्यात आली (PMPML) असून सदर मार्गावर सरासरी 30 मी. वारंवारीते ने बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच बस मार्ग क्र.229 मुकाई चौक ते वडगांव मावळ या मार्गावर 3 बसेसच्या सरासरी 30 मी. वारंवारीतेने बसेस उपलब्ध करून खेपामध्ये वाढ करण्यात आली आहे.

शेड्युल मध्ये वाढ केलेले बस मार्ग पुढील प्रमाणे…

बस मार्ग क्र.42 कात्रज ते निगडी, भक्ती शक्ती या मार्गावर ६ शेड्युलची वाढ करून खेपामध्ये वाढ करण्यात आली असून एकूण 25 शेड्युल द्वारे सरासरी 10 मी. वारंवारीते ने बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी वरील मार्गावर 380 खेपा संचलनात होत्या तथापि करण्यात आलेल्या बदला नंतर 472 खेपामध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.