Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात ‘जंगल गप्पां’मधून वन्यजीव सप्ताह साजरा

एमपीसी न्यूज – निसर्ग,वन्यजीव, पक्षी,सर्प,औषधी वनस्पती (Talegaon Dabhade)आदी विषयांवर जंगल गप्पा करत इंद्रायणी महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.या जंगल गप्पांमध्ये विद्यार्थ्यांना वन्यजीव आणि जंगल याबाबत तंत्रशुद्ध माहिती देण्यात आली. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतीलाल शाह सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. तसेच यावेळी फ्रेंड्स ऑफ नेचर संस्था आणि इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘इंद्रायणी निसर्ग कट्टा मंच’ स्थापन करण्यात आला.

 

यावेळी फ्रेंडस ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष (Talegaon Dabhade)महेश महाजन, वन्यजीव छायाचित्रकार सुपर्णा गायकवाड, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे,इंद्रायणी निसर्गकट्टा समन्वयक रोहित नागलगाव, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय आरोटे,डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा जी एस शिंदे उपस्थित होते.

PMPML : पीएमपीएमएलकडून 3 बस मार्ग खंडीत

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे (Talegaon Dabhade)आणि फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक महेश महाजन यांच्या संकल्पनेतून निसर्ग,वन्यजीव,
पक्षी,सर्प,औषधी वनस्पती आदी विषयांवर विद्यार्थ्यांच्या प्रबोधनाच्या दृष्टीने जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून अडीचशे विद्यार्थ्यांना इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतीलाल शाह सभागृहात जंगल गप्पा कार्यक्रमांतर्गत वन्यजीव आणि जंगले या विषयावर तंत्रशुद्ध माहिती देण्यात आली.

 

फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक महेश महाजन,सुपर्णा गायकवाड,रोहित नागलगाव यांनी विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले.

प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ संभाजी मलघे यांनी केले. त्यांनी इंद्रायणी निसर्ग कट्टा स्थापनेमागची भूमिका सांगत निसर्ग संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

राखी चौडनकर यानी सुत्रसंचालन केले व प्राध्यापक डॉ. शाम आवटे यानी सर्वांचे आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.