Express Way : मंगळवारी दोन तास पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर ब्लॉक

एमपीसी न्यूज – गॅन्ट्री उभारण्याच्या कामासाठी (Express Way )मंगळवारी (दि. 10) दुपारी बारा ते दोन या कालावधीत पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबई-पुणे या लेनवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. दोन तास द्रुतगती मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ठिकठिकाणी गॅन्ट्री बसवून त्यावर कॅमेरे लावण्यात येणार आहेत. द्रुतगती मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हे काम केले जात आहे. आयटीएमएस प्रकल्पांतर्गत पुणे लेनवर बोरघाट हद्दीत किलोमीटर 45 आणि किलोमीटर 45/800 या ठिकाणी गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे.

Pune : ‘दाभोलकर-पानसरे हत्या – तपासतील रहस्ये?’ पुस्तक प्रकाशित

या कामासाठी मंगळवारी दुपारी बारा ते दुपारी दोन या कालावधीत द्रुतगती मार्गावर मुंबई-पुणे या लेनवरील सर्व प्रकारची (Express Way ) वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. दरम्यान कारसाठी जुना पुणे मुंबई महामार्ग शिंग्रोबा घाटातून सुरू राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.