Kondhwa : स्वास्थ्यपूर्ण जगासाठी आयुर्वेद शाश्वत पर्याय- प्रा. डॉ. भूषण पटवर्धन

एमपीसी न्यूज – आयुर्वेदासह इतर भारतीय चिकित्सा पद्धतीचे महत्व (Kondhwa)अनेकदा अधोरेखित झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील आयुर्वेदाला, भारतीय पारंपरिक चिकित्सेला प्रोत्साहन दिले असून, औषध निर्माणाचा पहिला प्रकल्प जामनगरला उभारला आहे. स्वास्थ्यपूर्ण जगासाठी आयुर्वेद हा शाश्वत पर्याय असून, त्याला लोकाभिमुख करण्यासाठी आपण सर्वानी एकत्रित प्रयत्न करायला हवेत, असे मत आयुष मंत्रालयातील राष्ट्रीय संशोधक प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.

श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर (Kondhwa)आणि श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री विश्व व्याख्यानमाला व सातव्या राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे उद्घाटन डॉ. भूषण पटवर्धन यांनी केले. कोंढवा रस्त्यावरील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात हा सोहळा पार पडला.

Express Way : मंगळवारी दोन तास पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर ब्लॉक

यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, आमदार माधुरी मिसाळ, इस्कॉनचे सुंदरवर दास, भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाच्या बोर्ड ऑफ एथिक्स अँड रजिस्ट्रेशनचे अध्यक्ष वैद्य राकेश शर्मा, ट्रस्टचे अध्यक्ष सद्गुरू आनंदनाथ महाराज सांगवडेकर, मुख्य चिकित्सक व विश्वस्त वैद्य समीर जमदग्नी, विश्ववतीचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर, धूतपापेश्वरचे रणजित पुराणिक, बैद्यनाथचे सिद्धेश शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी वागभट दीपिका व आयुर्वेदीय औषधी द्रव्य शोधनविधी या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, अनेक वैद्याकडून बरेच काही शिकलेलो आहे. भारतीय संस्कृती, परंपरा यामध्ये भेदभाव नाही. नवनवीन संशोधन, नवोन्मेष करून आयुर्वेद अधिकाधिक विकसित व समृद्ध करण्यासाठी योगदान दिले पाहिजे. आयुष मंत्रालयाच्या मार्फत या भारतीय चिकित्सा पद्धती प्रभावशाली व लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेतअसे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी अतिथींच्या हस्ते आयुर्वेदामध्ये अनेक पिढ्यांपासून योगदान देणाऱ्या आयुर्वेदाचार्य यांचा सन्मान करण्यात आला. सुंदरवर दास, रणजित पुराणिक यांनी मनोगत व्यक्त केले. वैद्य परेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. निरंजनदास सांगवडेकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.