Talegaon Dabhade : रोटरी सिटीच्या वतीने एनएमएमएस व प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती परीक्षार्थींना पुस्तक संच वाटप

एमपीसी न्यूज – नवलाख उंबरे येथील श्रीराम विद्यालयात(Talegaon Dabhade) शेतमजूर,विट कामगार,पॉलिहाऊस कामगार, फार्महाऊस वाॅचमन,आदिवासी, अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या घटकातील विद्यार्थी शिक्षण घेतात.आपल्या बौद्धिक कौशल्याच्या जोरावर हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवतात. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने शिष्यवृत्ती पुस्तक संच वाटप करण्यात आले. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांची मोफत संगणकीय कल चाचणी घेण्यात आली.

नवलाख उंबरे येथील श्रीराम विद्यालयातील आर्थिक दुर्बल (Talegaon Dabhade)घटक शिष्यवृत्ती परीक्षेला प्रतिवर्षी विद्यार्थी बसवले जातात.शेतमजूर,विट कामगार,पॉलिहाऊस कामगार, फार्महाऊस वाॅचमन,आदिवासी, अत्यंत कमी उत्पन्न असणाऱ्या समाजातील घटकांची मुले या परीक्षेला बसतात,ही मुले गुणवत्ता यादीत आल्यास 9 वी ते 12 वी पर्यंत त्यांना शिष्यवृत्ती मिळते.या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून मेरिटमध्ये येण्यासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे सिटीने हा उपक्रम घेतला आहे.त्याचबरोबर या शाळेतील प्री.मॅट्रिक शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना देखील पुस्तक संच समारंभपूर्वक देण्यात आले.

Express Way : मंगळवारी दोन तास पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर ब्लॉक

या शाळेतील इयत्ता दहावीच्या(Talegaon Dabhade) विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी व बिट्स कॉम्प्युटर एज्युकेशन संस्था यांचे संयुक्त विद्यमाने मोफत संगणकीय कल चाचणी शिबिर घेण्यात आले.त्यांच्या विद्यालयातील 76 विद्यार्थ्यांना लाभ झाला. त्याचबरोबर इयत्ता दहावीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना ॲप देण्यात आला.

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मदत देणाऱ्या संस्थांचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या(Talegaon Dabhade) आई-वडिलांचे व शाळेचे नाव उंचावण्यासाठी खूप अभ्यास करून गुणवत्ता यादीत येण्यासाठी प्रयत्न करावा असे रोटरी सिटीचे अध्यक्ष रो.सुरेश शेंडे यांनी अध्यक्षीय मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना आव्हान केले व शुभेच्छा दिल्या.

रोटरी सिटीच्या विविधांगी उपक्रमांची माहिती देताना विद्यार्थ्यांनी शालेय नियम व स्वअभ्यासाच्या माध्यमातून अभ्यास कसा करावा हे सेक्रेटरी रो. भगवान शिंदे यांनी विषद करताना रोटरीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.रोटरी क्लबचे सामाजिक काम व रोटरीचा इतिहास प्रकल्प प्रमुख रो. नितीन शहा यांनी विशद करताना उपक्रमाचा हेतू व उद्देश प्रास्ताविकाद्वारे विशद केला.

संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे,रो रामनाथ कलावडे,रो रघुनाथ कश्यप, रो. विश्वास कदम, भैरवनाथ विकास सोसायटी आंबीचे चेअरमन,टाटा मोटर्सचे कामगार प्रतिनिधी अर्जुन वारिंगे इ.नी सदर प्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. बिट्स कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या सौ. कविता खोल्लम यांनी इयत्ता 10 वीतील 76 विद्यार्थ्यांचे संगणक व मोबाईलच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाद्वारे कल चाचणी शिबिर घेतले.रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी व श्रीराम विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज सोनकांबळे यांनी केले व आभार प्राचार्य गणपत कायगुडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.