World Cup 2023 : अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यालाही शुभमन गिल मुकणार

एमपीसी न्यूज – भारताचा युवा प्रतिभावंत फलंदाज शुभमन गिल (World Cup 2023)याची चार दिवसापुर्वी डेंग्यू चाचणी सकारात्मक आली होती. त्यामुळे त्याला भारत विरुध्द आस्ट्रेलिया सामना खेळता आला नाही. भारताचा सलामीवीर म्हणून आजपर्यंत शुभमनने केलेल्या खेळी पाहता त्याची उणीव काल झालेल्या सामन्यात जाणवली.

आस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल खेळू शकला नाही, त्याच्या जागी डाव्या हाताचा फलंदाज ईशान किशन याला संधी मिळाली. त्या संधीचा फायदा ईशानला घेता आला नाही.

तथापि, 11 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान लढतीमध्येही तो खेळू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शुभमन गिल हा सामन्यासाठी पूर्णपणे फीट नसल्याचे कळते आहे.

Kondhwa : स्वास्थ्यपूर्ण जगासाठी आयुर्वेद शाश्वत पर्याय- प्रा. डॉ. भूषण पटवर्धन

शुभमन गिल शिवाय भारतीय संघ दिल्ली येथे दाखल झाला असून (World Cup 2023) गिल चैन्नई येथेच त्याचे उपचार पूर्ण करणार आहे. त्याच्या सोबत वैद्यकीय टीम असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.