Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेचे जल्लोषात समारोप; भारताला ऐतिहासिक 107 पदकं

एमपीसी न्यूज – चीन मधील हांगझाऊ येथे सलग 16 दिवस (Asian Games 2023) चाललेल्या स्पर्धेचा समारोप खेळाडूंचे अद्भुत पराक्रम आणि चीनच्या सांस्कृतिक वारशाच्या रंगबेरंगी देखाव्यांनी समारोपाचा सोहळा दैदिप्यमान व संस्मरणीय ठरला. मोठ्या जल्लोषात या स्पर्धेची सांगता झाली.

ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया (OCA) चे कार्यवाहक प्रमुख रणधीर सिंग, चीनचे पंतप्रधान ली कियांग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा 80,000 आसन क्षमतेच्या ‘बिग लोटस’ स्टेडियमवर प्रकाश, ध्वनी आणि लेझरच्या सादरीकरणाने पार पडला.

यावेळी रणधीर सिंह म्हणाले, “आशियातील तरुणांनी बंधुत्वाच्या भावनेने आणि मानवतेच्या भल्यासाठी आशियाई खेळ साजरे (Asian Games 2023) करावेत.”

या स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करत 107 पदकं मिळविली. यामध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश आहे. सलग 16 दिवस चाललेल्या या स्पर्धेचा समारोप मोठ्या जल्लोषात करण्यात आला.

World Cup 2023 : अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यालाही शुभमन गिल मुकणार

पदक विजेत्या देशांच्या यादीमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर असून, प्रथम क्रमांकावर यजमान चीन आहे. त्याने तब्बल 383 पदकं आपल्या नावे केले आहेत. यामध्ये 201 सुवर्ण, 111 रौप्य आणि 71 कांस्य पदकांचा समावेश आहे.

तर दुसऱ्या क्रमांकावर 188 पदकं मिळवून जपान विराजमान झाला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर प्रजासत्ताक कोरिया असून त्याच्या नावे 190 पदकं आहेत. तसेच पाचव्या क्रमांकावर उज्बेकिस्तान असून त्याच्या नावे 71 पदकं जमा आहेत.

या स्पर्धेत पाकिस्तानला केवळ 3 पदकं मिळाली असून त्यामध्ये 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकांचा समवेश आहे.

त्याला एकही सुवर्ण पदक मिळवता आले नाही. हांगझोऊ येथे झालेल्या या स्पर्धेत 45 राष्ट्रांतील सुमारे 12,407 खेळाडूंनी विविध 40 खेळांमध्ये सहभाग घेतला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.