Asian Games 2023 : खूशखबर! हॉकीमध्ये भारताला सुवर्ण पदक; हॉकी संघ पॅरीस ऑलिंपिकसाठी पात्र

एमपीसी न्यूज – भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी खेळात भारताने (Asian Games 2023) आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. भारताने जपानचा 5 – 1 अशा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या खेळीमुळे भारताचा हॉकी संघ 2024 मध्ये पॅरीस येथे होणार असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

कर्णधार हरमनप्रीत सिंहने केलेल्या 2 गोलच्या बळावर भारताने जपानवर एकतर्फी विजय मिळवत सुवर्ण पदक मिळवले आहे. यावेळी भारताच्या वतीने हरमनप्रीत सिंह 32’ आणि 59 व्या मिनिटाला गोल साकारले.

मनप्रीत सिंहने 25 व्या मिनिटाला गोल केले. अमित रोहिदास याने 36 व्या मिनिटाला चेंडू जाळीपार केले, तर अभिषेकने 48 व्या मिनिटाला गोल साकारले. प्रत्युत्तरात जपानला एकच गोल करता आला. जपानच्या एस तनाकाने हा गोल 51 व्या मिनिटाला साकारला.

Pimpri : डॉ. अशोक शिलवंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ सोमवारी पुरस्कार वितरण

सुरुवातीला दोन्ही संघाकडून बचावात्मक पवित्रा घेत खेळ करण्यात येत होता. 15 मिनिटाला भारताला पॅनल्टी कॉर्नर मिळाला (Asian Games 2023) पण भारताला त्याचा लाभ घेता आला नाही. निर्णायक सामन्यात भारताने केलेल्या आक्रमक खेळी समोर जपानचा निभाव लागला नाही. यासह भारताच्या खात्यात आतापर्यंत 95 पदकं जमा झाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.