Pimpri : डॉ. अशोक शिलवंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ सोमवारी पुरस्कार वितरण

एमपीसी न्यूज – अशोक सर्वांगीण विकास सोसायटी (Pimpri) व अशोक नागरी सहकारी बँकेचे संस्थापक दिवंगत डॉ. अशोक शीलवंत यांच्या तृतीय स्मृती दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 9 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे विविध पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माजी नगरसेविका सुलक्षणा धर यांनी दिली.

यावेळी आचार्य रतनलाल सोनग्रा, महेंद्र भारती, अशोक नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड. राजरत्न शीलवंत आदी उपस्थित होते. सुलक्षणा शिलवंत धर यांनी सांगितले की, या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस भूषविणार आहेत.

Pune : ध्यानचंद अकदामी आणि आर्मी बॉईज कंपनी संघांत अंतिम झुंज

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत (Pimpri) पाटील, उद्योजक सचिन इटकर, ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच डॉ. अशोक शीलवंत यांच्या नावाने धम्मदीप पुरस्कार दैनिक लोकमतचे पुणे आवृत्ती संपादक संजय आवटे, समाजभूषण पुरस्कार माजी आमदार ॲड.जयदेव गायकवाड आणि बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस, विद्या भूषण पुरस्कार इंद्रायणी शिक्षण संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे, पत्रकार भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आणि काव्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ कवयत्री स्वाती सामक यांना प्रदान करण्यात येणार आहेत.

लेणी संवर्धन व विहार संवर्धन समिती सन्मान सोहळा व ज्येष्ठ साहित्यिक बाबा भारती यांनी अनुवादित केलेल्या धम्मपद ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे पुस्तक प्रकाशन श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. अशोक शिलवंत यांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ॲड. राजरत्न शिलवंत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.