Asian games 2023 :आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने गाठली पद्कांची शंभरी; क्रिकेटमध्ये पुरुष संघाला सुवर्ण.

एमपीसी न्यूज – आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची(Asian games 2023) शंभरी गाठणा-या देशांच्या यादीत आता भारताचाही समावेश झाला आहे. भारताने ऐतिहासिक कामगिरी करताना 107 पदके मिळवली आहेत. आतापर्यंत चीन, साउथ कोरिया आणि जपान यांनी शंभरी गाठली आहे.

भारताच्या खात्यात आतापर्यंत 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य अशी 107 पदकं जमा झाली आहेत.

Pune – इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये राकेश धोत्रे यांची नोंद

भारताने विविध खेळांमध्ये हे पदकं मिळवले आहेत. तथापि, क्रिकेटमध्ये भारताच्या (Asian games 2023)पुरुष संघाला सुवर्ण पदक मिळाले आहे. काल झालेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्थान सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे खेळ पूर्ण होऊ शकला नाही. या स्पर्धेत भारताचा गुणांक जास्त असल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.