Nigdi : डॉक्टर महिलेची 89 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – उपचारासाठी येणाऱ्या(Nigdi) रुग्णाने डॉक्टर महिलेला त्याच्या बांधकाम साईटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रकमेचा फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून 89 लाख 58 हजार रुपये घेत डॉक्टर महिलेची फसवणूक केली. ही घटना डिसेंबर 2012 ते 3 ऑक्टोबर 2023 या कालावधीत संभाजीनगर चिंचवड येथे घडली.

राजेश घेवरचंद जैन (वय 47, रा. फोर्ट, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी डॉक्टर महिलेने निगडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि, 7) फिर्याद दिली आहे.

Pune – इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये राकेश धोत्रे यांची नोंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे (Nigdi)संभाजीनगर चिंचवड येथे हॉस्पिटल आहे. आरोपी राजेश जैन हा फिर्यादी यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत होता. त्यातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने फिर्यादी यांना मुंबई येथे त्याच्या बांधकाम साईटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले.

गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रकमेचा फ्लॅट सदर इमारतीमध्ये देण्याचे आरोपीने आमिष दाखवले. त्यानंतर इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील एक फ्लॅट फिर्यादी यांना दिल्याचे पत्र त्याने फिर्यादीस ईमेलवर पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.

इमारतीचे काम न करता तो प्रकल्प अर्धवट सोडून फिर्यादी कडून आरोपीने 89 लाख 58 हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना फ्लॅट अथवा त्यांची रक्कम परत केली नाही. फिर्यादी यांनी रक्कम परत मागितली असता ‘मी तुझी एकही रक्कम देणार नाही.

तुला जे काही करायचे आहे ते कर. मला परत रक्कम मागितली तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही. तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून उलट तुलाच येरवडा जेलमध्ये पाठवीन’, अशी आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.