Nigdi : रनाथॉनमध्ये धावले 4 हजार स्पर्धक

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ़ निगडीच्या (Nigdi) वतीने आयोजित केलेल्या “रनाथॉन ऑफ होप” या मॅरेथॉनमध्ये 4 हजार स्पर्धेक धावले. या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी रोटरी क्लब 3131 च्या प्रांतपाल मंजू फडके, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक राजेश कुमार, झोनल व्यवस्थापक राहुल वाघमारे, रोटरी क्लब निगडीचे अध्यक्ष हरबिंदरसिंग दुल्लत, सचिव शशांक फडके, रनथॉनचे संचालक विजय काळभोर आदी उपस्थित होते.

 

 

या स्पर्धेत केनियातील 6 स्पर्धक, पोलीस दलातील 150 पोलीस अधिकारी व कर्मचारी, एनडीआरएफ आणि सीआरपीएफचे जवानांनी विशेष सहभाग नोंदवला.

Pune – इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये राकेश धोत्रे यांची नोंद

या स्पर्धेच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या निधीतून (Nigdi)रोटरी क्लब ऑफ़ निगडी तर्फे ग्रामीण भागात समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये आनंदी शाळा, आनंदी ग्राम, वैद्यकीय प्रकल्पाचा समावेश आहे, अशी माहिती रनाथॉनचे संचालक विजय काळभोर यांनी यावेळी दिली.

 

स्पर्धेचा निकाल अनुक्रमे प्रथम,द्वितीय, तृतीय पुढीलप्रमाणे-

21 किमी- पुरूष गटात विवेक मोरे, अक्षय कुमार , विवेक यादव महिला- प्राजक्ता गोडबोले , प्रमिला पाटील,शीतल भंडारी. केनियाच्या सुझान चेबेट यांना विशेष बक्षीस दिले.

 

10 किमी वय 45 पेक्षा अधिक

पुरुष- जयपाल भोयर गोवर्धन मीना , संतू वर्धे . महिला – पल्लवी मूग , प्रसन्नप्रिया रेड्डी , शृति भिडे

 

10 किमी वय 45 पेक्षा कमी गटात

 

पुरुष- शुभम भंडारे , आसिफ खान , मृणाल सरोदे

 

महिला

सोनाली देसाई, शिवानी चौरसिया , ऐश्वर्या खळदकर

केनियाची लिलियन रुट्टो विशेष बक्षीस

 

5 किमी 45 पेक्षा अधिक वयोगटात पुरुष

रंजीत कणभरकर, समीर कोयला, मुकेश मिश्रा

 

महिला

निशानी कांबळे, पूजा माहेश्वरी, सुरेखा गावडे

 

5 किमी 45 वयातील पुरुष

दिव्यांशू कुमार, अभिषेक देवकाते, यशराज चकुरे

महिला

यामिनी ठाकरे, सृष्टी रेडेकर, मानसी यादव

 

कॉर्पोरेट विभाग- 5 किमी ( वैयक्तिक)

अनुज करकरे, केशव गुजारे, मयूर काकडे

 

कॉर्पोरेट ( सांघिक )

एंप्रो इंडस्ट्रीज प्रा लि, एमर्सन इंडस्ट्रीज, बॉश कंपनी

यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी बॉइज 4 सिनेमाच्या कलाकारांनी स्पर्धेला हजेरी लावून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.