Wakad : गहाण ठेवलेली गाडी परत देण्यास नकार देत फसवणूक

एमपीसी न्यूज – गहाण ठेवलेली गाडी पैसे(Wakad) दिल्यानंतर परत करण्याची मागणी केली असता गाडी परत न करता फसवणूक केली. ही घटना एप्रिल 2022 ते जून 2022 या कालावधीत लक्ष्मण नगर थेरगाव येथे घडली. याप्रकरणी सात ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आशिष राजू भुरे (वय 26, रा. लक्ष्मणनगर, थेरगाव) असेल गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Nigdi : रनाथॉनमध्ये धावले 4 हजार स्पर्धक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Wakad)महिलेने त्यांची मारुती सुझुकी एस क्रॉस ही गाडी एक महिन्यासाठी आरोपी आशिष याच्याकडे गहाण ठेवली. त्या बदल्यात दीड लाख रुपये फिर्यादी यांना देण्याचे ठरले. त्यावेळी आशिष याने फिर्यादीस एक लाख रुपये रोख दिले. त्यानंतर 50 हजार रुपये ऑनलाईन पाठवतो, असे सांगून ते पाठवले नाहीत. फिर्यादी यांनी वारंवार 50 हजार रुपये पाठवण्याची विनंती केली. मात्र आशिष याने ते पैसे पाठवले नाहीत. एक महिन्यानंतर फिर्यादी यांनी आशिष याला फोन करून त्याने दिलेले पैसे घेण्याची आणि त्यांची कार परत करण्याची विनंती केली.

 

त्यावेळी आशिष याने त्याचे एक लाख (Wakad)व्याजासहित एक लाख 35 हजार रुपये झाले असून तेवढे पैसे दिल्यास गाडी देतो असे सांगितले. फिर्यादी यांनी गाडी दे आणि पैसे घेऊन जा असे सांगितले असता आशिष याने अगोदर पैसे द्यावे लागतील नंतर गाडी देतो, असा तगादा लावला. त्यानंतर फिर्यादी यांनी एका मध्यस्थीद्वारे आरोपीला तीन टप्प्यांमध्ये एक लाख 35 हजार रुपये रोख स्वरूपात दिले. त्यानंतरही आरोपीने फिर्यादी यांची गाडी न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.