Chakan : मित्राने केला कारचा अपहार

एमपीसी न्यूज – गाडी आणून देतो असे म्हणून (Chakan)नेलेली कार परत न करता मित्राची फसवणूक केली. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या मित्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तीन सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे घडली .

 

ज्ञानेश्वर रामप्रसाद नाईकवाडे (रा. कडाचीवाडी, ता. खेड. मूळ रा. जालना) असे गुन्हा दाखल झालेल्या मित्राचे नाव आहे. याप्रकरणी विठ्ठल अशोक वनवे (वय 28, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विठ्ठल यांनी(Chakan) ओला उबेर आयडीवर स्विफ्ट कार खरेदी केली आहे. तीन सप्टेंबर रोजी विठ्ठल यांचा मित्र आरोपी ज्ञानेश्वर याने फिर्यादी यांची कार आणून देतो असे म्हणून घेऊन गेला तो परत आला नाही. तसेच त्याने कार देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर त्याने मोबाईल फोन बंद करून ठेवला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याच्याशी संपर्कही होत नसल्याने फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा नोंदवला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.