Madhypradesh: मध्यप्रदेश कॉंग्रेसचा जाहीरनामा

एमपीसी न्यूज – मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगाना आणि मिझोरम(Madhypradesh) या पाच येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याचे संकेत असून त्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याअनुषंगाने देशातील राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी आपापला जाहीरनामा लोकांसमोर मांडायला सुरुवात केली आहे. मध्यप्रदेश कॉंग्रेसने देखील त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

मध्यप्रदेश कॉंग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात विविध महत्वपूर्ण विषयाचा समावेश करण्यात(Madhypradesh) आला आहे. 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा आणि 200 युनिटपर्यंत अर्धे बिल माफ करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Wakad : गहाण ठेवलेली गाडी परत देण्यास नकार देत फसवणूक 

गॅस सिलेंडर 500 रुपयांना उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सोबतच महिलांना 1500 रुपये महिना पेन्शन देण्याबाबत उल्लेख करण्यात आला आहे, पेन्शनधारकांना जुनी पेन्शन लागू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जातीधारित जनगणना करणार, मागासवर्गीयांना 27 टक्के आरक्षण देणार, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आणि शेतकऱ्यांना ५ हॉर्स पॉवरची वीज सिंचनासाठी मोफत देणार असल्याचेही जाहीरनाम्यात नमूद केले आहे.

 

यावेळी कॉंग्रेसच्या वतीने कर्नाटकामध्ये देण्यात आलेले आश्वासन कॉंग्रेसने पूर्ण केल्याबाबत सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.