Congress: राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेने महाराष्ट्रात वातावरण बदलणार?

एमपीसी न्यूज – भारत जोडो यात्रेच्या लोकसहभागातून (Congress) आणि अभूतपूर्व यशानंतर राहुल गांधी यांनी 14 जानेवारी पासून भारत न्याय यात्रेला सुरुवात केली. मणिपूर पासून ते मुंबई पर्यंत असणारी ही यात्रा येत्या आज महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे.त्यासाठीची तयारी देखील सुरू आहे.

दडपशाही आणि अन्याय अत्याचाराने त्रासलेल्या सर्वांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी राहुल गांधी यांची ही यात्रा महाराष्ट्र मध्ये अतिशय प्रभावी ठरेल. फोडाफोडीच्या राजकारणात भाजपाने महाराष्ट्रातील दोन प्रादेशिक पक्ष फोडून तीन विविध पक्षांचे सरकार एकत्रित करून सरकार चालवत आहे. राज्यामध्ये ED ,CBI अश्या अनेक केंद्राच्या संस्थांच्या चौकशी या अन्य पक्षांच्या नेत्यांवर लावून एक दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे कधीच अपेक्षित नव्हतं अशा प्रकारचं राजकारण सध्या महाराष्ट्रात चालू आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर अनेक अन्यायकारक आणि कुठल्याही चर्चेविना अनेक विधेयक पास करून घेणे किंवा अधिकाऱ्यांना दबाव तंत्र आणि निवडणुकीमध्ये सत्तेसाठी वापर करून घेणे (चंदीगड येथील निवडणूक) असे अनेक प्रकार सध्या सत्तेतील सरकार द्वारे केले जात आहेत.

महाराष्ट्रात अजूनही भक्कमपणे काँग्रेस विचारांचा वारसा तसाच ठेवून काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. काँग्रेस पक्षाला शहरी, ग्रामीण भागात अनेक कार्यकर्ते व मोठा जनाधार लोकांचा आहे. आगामी येणाऱ्या लोकसभेच्या 48 जागांमध्ये मागच्या काळात झालेले सर्वे हे महाविकास आघाडी, इंडिया आघाडीला सकारात्मक, चांगल्या जागा दर्शवणारे आहेत. यामध्ये राहुल गांधी यांची न्याय यात्रा महाराष्ट्रात नंदुरबार,धुळे ,नाशिक ,ठाणे आणि मुंबई या भागांमधून प्रवास करणार आहे. यामध्ये विशेषतः नंदुरबार ,धुळे ,नाशिक आणि मुंबई या भागामध्ये काँग्रेसचे खासदार अनेक वेळा जिंकून आले आहेत. एक जनाधार काँग्रेसला या भागामध्ये आहे. नंदुरबार मधून अनेक वेळा लोकसभेचे निवडणुकीची सुरुवात काँग्रेसने केली आहे.

Thergaon : चोरीचा आळ घेतला म्हणून दाम्पत्याला शिवीगाळ व मारहाण

धुळे, मालेगाव हा देखील काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो मुंबईमध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडीला यात्रेचा वातावरण निर्मितीसाठी चांगला परिणाम होऊ शकतो. पारंपारिक काँग्रेसचा मतदार असलेल्या या मतदारसंघांमधून जाणारी यात्रा निश्चित आगामी काळात महाविकास आघाडीला पूरक ठरणारी आहे. महायुती मधील जागा वाटपाचा पेचकायम असून त्यांच्यातील गोंधळ हा सर्व काही अलबेल आहे असं दर्शवत नाही. मूळ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या बाजूने मतदार आहेत असे चित्र दिसत आहे. यात राहुल गांधींची न्याय जोडो यात्रा व त्यांनी युवकांसाठी (Congress) सांगितलेल्या पाच गॅरंटी ज्यामध्ये भरतीचा विश्वास, पहिल्या जॉबची गॅरंटी अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या माध्यमातून देणार, पेपर फुटीच्या संदर्भात कायदा तयार केला जाणार, गिग इकॉनोमी मध्ये सामाजिक सुरक्षाचा विश्वास, युवा रोशनी सोबतच देशात जातीनिहाय जनगणना, जनतेचे आर्थिक मॅपिंग हे दोन ऐतिहासिक निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक धरून महाविकास आघाडीला महाराष्ट्रात भारत न्याय जोडो यात्रेचा फायदा होईल.

गौरव चौधरी
(लेखक भारतीय युवक काँग्रेसचे नॅशनल मीडिया पॅनलिस्ट(प्रवक्ते) आहेत.)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.