Vasant More : अखेरचा जय महाराष्ट्र…साहेब मला माफ करा…वसंत मोरे यांचा मनसे पदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज : पुण्यातून मोठी बातमी समोर (Vasant More) आली आहे. मनसेचे फायर ब्रॅंड नेते म्हणून ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी आज अखेर मनसेचा राजीनामा दिला. अखेरचा जय महाराष्ट्र…साहेब मला माफ करा…म्हणत वसंत मोरे यांनी आज राजीनामा दिल्याचे सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहीर केले. त्यांनी काल रात्री फेसबुकवर एका मर्यादेच्या बाहेर त्रास गेल्यावर माणूस शांत होतो म्हणत एक पोस्ट केली होती. यावेळी वसंत मोरे यांचा मनसे सोडायचा निर्णय झाला असल्याचे अनेकांनी अंदाज वर्तवले होते. शिवाय काही दिवसांपूर्वी त्यांनी अचानक शरद पवार यांचीही भेट घेतल्याने मोरे मनसेच्या बाहेर पडणार अशी चर्चा सुरू होती.  

राजीनाम्यामध्ये वसंत मोरे यांनी लिहिले आहे, की पक्षाच्या स्थापनेपासून किंबहुना त्याही आधीपासून पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेले 18 वर्षे सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु, अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रती असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहेत.

Congress: राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेने महाराष्ट्रात वातावरण बदलणार?

भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो; त्यांना ताकद देतो, त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचे तंत्र अवलंबले जात आहे; म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वसह सर्व पदांचा राजीनामा देत आहे.  कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.

गेले काही महीने वसंत मोरे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरूच होत्या. आज (Vasant More) अखेर त्यांनी राजीनामा दिला असून आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.