Pune : ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमामध्ये पुणे महापालिकेकडून अमृत कलश राज्य शासनाकडे सुपूर्द

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या वतीने आज (शुक्रवार) रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर (Pune) येथे आयोजित ‘माझी माती माझा देश’ अंतर्गत अमृत कलश राज्यशासनाकडे सुपूर्द करण्यासाठी कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला होता. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमा दरम्यान महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते अमृत कलश राज्यशासनाकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त अजित देशमुख, सचिन इथापे, महेश पाटील, डॉ. चेतना केरूरे, तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात तसेच पुण्यात 9 ऑगस्ट क्रांतिदिनी ‘माझी माती माझा देश’ अभियानाला सुरुवात झाली. .

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मनोगत व्यक्त करताना उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील 33 हजार नागरिकांनी पंचप्रण शपथ घेतली आणि विविध प्रभागात 11 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. विविध घटकांद्वारे क्षेत्रीय कार्यालय निहाय एकूण 138 ठिकाणांहून माती गोळा करून त्याचा अमृत कलश तयार करण्यात आला होता.

Asian Games 2023 : खुशखबर! हॉकीमध्ये भारताला सुवर्ण पदक; हॉकी संघ पॅरीस ऑलिंपिकसाठी पात्र

तर 1 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान पुणे जिल्ह्यातील ८६ हजार 723 घरांमधून माती संकलित करण्यात आली, अशी माहिती (Pune) दिली. तसेच संपूर्ण पुणेकर नागरिक, मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त डॉ. चेतना केरूरे यांनी व्यक्त केले.

अमृत कलश यात्रेत 17 हजार 650 नागरिक / लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणांहून ढोल-ताशांच्या गजरात मूठभर माती आणि मूठभर तांदूळ संकलन केले. तसेच ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केले, अशा वंदनीय स्वातंत्र्य सैनिक व वीरांचे स्मरण करून पंचप्रण शपथ घेण्यात आली. तसेच अमृत वाटिका असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.