Lonavala : आरोपी निष्पन्न न झाल्याचा अहवाल पाठविण्यासाठी आरोपींकडे लाचेची मागणी; सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गुन्ह्याचा तपास करत असताना (Lonavala) आरोपी निष्पन्न होऊन देखील आरोपी निष्पन्न न झाल्याचा अहवाल पाठविण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्य पोलीस निरीक्षकाने आरोपींकडे एक लाख 40 हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकावर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास हिरामण करंडे (नेमणूक – लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली आहे.

Pune : ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमामध्ये पुणे महापालिकेकडून अमृत कलश राज्य शासनाकडे सुपूर्द

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेविरोधात ऑगस्ट 2022 मध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास करंडे यांच्याकडे आहे. गुन्ह्याचा तपास करत असताना करंडे यांनी तक्रारदार महिलेकडे तपासाचा अ फायनल (गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हा गुन्हा कायम तपासावर ठेवण्यात येत आहे) अशा प्रकारचा अहवाल पाठवण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार महिलेने एसीबीकडे तक्रार केली.

त्यानंतर एसीबीने 23 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची पडताळणी केली. त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक करंडे (Lonavala) यांनी तक्रारदार महिलेसह गुन्ह्यातील इतर आरोपींकडे एकूण एक लाख 40 हजार रुपयांची लाच मागितल्याचे उघडकीस आले. त्यानुसार याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.