Asian Games 2023 : नीरज चोप्राला सुवर्ण तर किशोर जेनाला रौप्य पदक; भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच स्पर्धेत दोघांना पदकं

एमपीसी न्यूज – गोल्डन बॉय अशी ख्याती (Asian Games 2023) असलेला भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे, तर भारताच्या किशोर जेना याने देखील यावेळी भालाफेक क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळवले आहे.

चीन मधील हांगझाऊ येथे होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारताच्या या दोन खेळाडूंनी इतिहास रचत भालाफेक या एकाच स्पर्धेत 2 पदकं भारताला मिळवून दिली आहेत. यावेळी सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राने 88.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

तर किशोर जेना याने 87.54 मीटर भाला फेकत रोप्य पदक आपल्या नावे केले आहे. या पदकांसह आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताने आजपर्यंत 18 सुवर्ण, 31 रौप्य, 32 कांस्य अशी एकूण 81 पदकं आपल्या नावे केले आहेत. यासह भारत पदक विजेत्या देशांच्या यादीत चौथ्य क्रमांकावर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.