PCMC : अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची फेरनियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC) अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांची प्रतिनियुक्तीने फेरनियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती असणार आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवले यांनी काढले.

महापालिकेत उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची 13 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यानंतर राज्य शासनाने 22 सप्टेंबर 2022 रोजी झगडे यांची नियुक्ती रद्द करुन प्रदिप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. पण, झगडे यांनी जांभळे यांच्या नियुक्तीला महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट) आव्हान दिले होते.

Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे बी फार्मसी महाविद्यालयामध्ये लाइफ केअर फिटनेस क्लबचे उद्घाटन

त्यावर जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती 22 सप्टेंबर 2023 पर्यंतच राहील. त्यादिवसापासून जांभळे यांची दोन (PCMC) वर्षांची नियुक्ती संपुष्टात येईल. जांभळे यांची पुन्हा पात्रता तपासण्याबाबत निर्देश दिले होते. मॅटच्या आदेशानुसार प्रतिनियुक्तीच्या पदाकरिता पात्रता पुनःश्च तपासण्यात आली. सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने जांभळे यांची महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावरील प्रतिनियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी कायम ठेवण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.