Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे बी फार्मसी महाविद्यालयामध्ये लाइफ केअर फिटनेस क्लबचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्यामंदिर संचलित (Talegaon Dabhade) कृष्णराव भेगडे बी फार्मसी महाविद्यालयामध्ये लाइफ केअर फिटनेस क्लबचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 2) झाले. महिला सशक्तीकरण आणि महिलांचे आरोग्य या विषयावर यावेळी उपस्थितांनी उहापोह केला. महिलांनी शारीरिक व मानसिकरित्या का निरोगी असणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे,संस्थेचे विश्वस्त संजय साने, लाईफ केअर फिटनेस क्लबच्या संचालिका मनीषा पापळ -भेगडे, डी.फार्मसीचे प्राचार्य जी.एस. शिंदे,इंद्रायणी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस.पी.भोसले उपस्थित होते.

संस्थेच्या अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिला सबलीकरणासाठी क्लबच्या माध्यमातून महिलांसाठी कसा उपयोग होईल यासंबंधी मार्गदर्शन केले.संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी आजच्या धावपळीच्या युगामध्ये महिलांसाठी आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम किती महत्त्वाचा आहे याचे विश्लेषण केले.

Pimpri : विकसित पिंपरी-चिंचवडला ‘स्मार्ट’ बनवण्याचा निर्धार!

त्याचप्रमाणे या कार्यक्रमांमध्ये लाईफ केअर फिटनेसच्या क्लबच्या संचालिका मनीषा पापळ-भेगडे यांनी आजच्या महिलांनी शारीरिक व मानसिकरित्या का निरोगी असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी योगा, व्यायाम का महत्त्वाचा आहे याची सविस्तर माहिती त्यांच्या भाषणातून दिली. लाइफ केअर फिटनेस क्लबमधल्या महिलांनी देखील अतिशय उत्कृष्टपणे आपले मनोगत व्यक्त करून आपले अनुभव सांगितले.

बी फार्मसी महाविद्यालयाचे शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. गणेश म्हस्के यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आयोजन (Talegaon Dabhade) रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.योगेश झांबरे, प्रा. तेजस्विनी कोठावळे, प्रा. श्रीभवानी राकेश, प्रा.निलेश सोनवणे यांनी केले.संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे,कार्यवाह चंद्रकांत शेटे, विश्वस्त निरूपा कानिटकर,विश्वस्त संजय साने आदी मान्यवरांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डी.फार्मसीचे प्राचार्य जी.एस.शिंदे सरांचे मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.