Vadgaon : वाढदिवसानिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांना कपड्यांचे वाटप

एमपीसी न्यूज – श्री पोटोबा महाराज देवस्थान उत्सव समिती (Vadgaon) अध्यक्ष संजय सजन दंडेल यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवला. दंडेल यांनी वडगाव मधील 50 आरोग्य कर्मचाऱ्यांना कपडे वाटप केले. आरोग्य विभागातील कर्मचारी करत असलेल्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी हा उपक्रम राबविला.

याप्रसंगी माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, माजी नगरसेवक चंद्रजित वाघमारे, मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, पत्रकार विजय सुराणा, गणेश विनोदे, व्याख्याते विवेक गुरव, शरद ढोरे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब तुमकर, उमेश ढोरे, शिवाजी येळवंडे, गणेश ढोरे सोमनाथ आगळे, रवी साबळे व बहुसंख्येने आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, पत्रकार विजय सुराणा, गणेश विनोदे आदींनी दंडेल यांना शुभेच्छा दिल्या.

Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे बी फार्मसी महाविद्यालयामध्ये लाइफ केअर फिटनेस क्लबचे उद्घाटन

“वाढदिवस प्रसंगी संजय दंडेल म्हणाले समाजात जगत असताना आपण समाजाचं देणे लागतो, सामाजिक बांधिलकीतुन (Vadgaon) आरोग्य कर्मचारी हे आपल्या घराचा परिसर स्वच्छ करतात. त्यामुळे आपले आरोग्य तंदुरुस्त राहते. त्यांच्या प्रति आदर म्हणून कपडे वाटप करताना आनंद वाटतो.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन व्याख्याते विवेक गुरव यांनी केले. आभार बाळासाहेब तुमकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.