Pune : सहाव्या सिटी प्रीमियर लीग (सीपीएल) आंतर क्लब 7- अ- साईड फुटबॉल स्पर्धेेत डीसी ड्रॅगन्स संघाची विजयी मालिका कायम

आर्यन शेडगेची दोनवेळा हॅट्रिक कामगिरी

एमपीसी न्यूज-सहाव्या सिटी प्रीमियर लीग (सीपीएल)2024 7- (Pune )अ- साईड फुटबॉल स्पर्धेेत साखळी फेरीत आर्यन शेडगेने केलेल्या दोनवेळा केलेल्या हॅट्रिक कामगिरीच्या जोरावर डीसी ड्रॅगन्स संघाने 15 वर्षाखालील गटात सुरेख कामगिरी करत आपली विजयी मालिका कायम ठेवली.

 

स्पोर्टस फाऊंडेशन पुणे यांच्या मालकीच्या सिटी(Pune ) एफसी पुणे यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 15 वर्षाखालील गटात पहिल्या सामन्यात आर्यन शेडगे(9,12,17,22मि.) याने नोंदवलेल्या चार गोलाच्या जोरावर डीसी ड्रॅगन्स संघाने प्रबल पँथर्स संघाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला.

Central Railway : मध्य रेल्वेने नऊ महिन्यात विकले 300 कोटींचे भंगार

दुसऱ्या सामन्यात डीसी ड्रॅगन्स संघाने सक्सेस स्ट्रायकर्सचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. विजयी संघाकडून आर्यन शेडगे(12, 19, 20मि.)ने तीन गोल केले.

निकाल: साखळी फेरी: 15 वर्षाखालील गट:

डीसी ड्रॅगन्स: 4 (आर्यन शेडगे 9, 12, 17, 22मि.)वि.वि.प्रबल पँथर्स: 0

सक्सेस स्ट्रायकर्स: 5 (पार्थ भारद्वाज 9मि., स्वरित जीवतोडे 11, 21मि., स्वरित जाधव 17, 24मि.)वि.वि.क्रॉसफ्लेक्स किंग्स: 1(अर्णव मिश्रा 15मि.)

डीसी ड्रॅगन्स: 5(आर्यन शेडगे 13, 19, 23मि., समर्थ तावरे 15मि.) वि.वि.क्रॉसफ्लेक्स किंग्स: 1 (अर्णव मिश्रा 17मि.)

सक्सेस स्ट्रायकर्स: 2 (पार्थ भारद्वाज 13मि., स्वरित जीवतोडे, 17मि.)वि.वि.प्रबल पँथर्स: 1 (आरव वानखडे 9मि.)

डीसी ड्रॅगन्स: 3 (आर्यन शेडगे 12, 19, 20मि.)वि.वि.सक्सेस स्ट्रायकर्स: 2 (पार्थ भारद्वाज 12मि., स्वरित जीवतोडे 18मि.)

प्रबल पँथर्स: 1 (आरव वानखडे 15, 22मि.)वि.वि.क्रॉसफ्लेक्स किंग्स: 0

17 वर्षांखालील गट:

कॉन्स्टिलेशन चिताज: 1(श्लोक मोरे 15मि.)पराभुत वि.आदित्य ऑलस्टार्स: 2 (माधव अभय 9मि., ललित पाटील 23मि.)

सक्सेस स्ट्रायकर्स: 4 (आदर्श अजित 6, स्वप्नील महामुनी 10, अमित निपाणे 15, सोहम चौधरी 22)वि.वि.प्रबल पँथर्स: 1(प्रथमेश सावदे 13)

कॉन्स्टिलेशन चिताज: 1 (सुजल देवकर 2मि.) पराभुत वि. प्रबल पँथर्स: 4 (रोहित रावत 12मि., हुबर्ट डेबमर्मा 18, 20, 24मि.)

सक्सेस स्ट्रायकर्स: 0 बरोबरी वि.आदित्य ऑलस्टार्स: 0

कॉन्स्टिलेशन चिताज: 0 पराभूत वि.सक्सेस स्ट्रायकर्स: 1 (अद्वैत मदनगरली 12मि.)

आदित्य ऑलस्टार्स: 1 (अमित जरे 18मि.)पराभुत वि. प्रबल पँथर्स: 3 (प्रथमेश सावदे 9, 13, 19मि.)

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.