Pune : माफिया ललित पाटील याला ससुन रुग्णालयात दाखल करण्यासाठी दादा भुसेंनी फोन केले का? सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

एमपीसी न्यूज : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ससुन रुग्णालयातील ड्रग्ज माफिया (Pune) प्रकरणी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणत्या आमदाराने फोन केले होते? दादा भुसेंचे ते फोन कॉल होते का? असा मोठा गौप्यस्फोट करत दादा भुसे यांचे नाव घेत त्यांनी थेट त्यांच्यावर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. 

आगामी दसरा मेळाव्या संदर्भात सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवतीर्थावर यंदा दसरा मेळावा त्याच उत्साहात आणि जोशात पार पडणार असल्याचे अंधारे यांनी माध्यमांना सांगितले.

Pune : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा अजित पवारांकडून राजीनामा

त्यासोबतच गृहखाते आणि आरोग्य खाते हे कशातच गंभीर नाही हे वारंवार दिसत आहे असल्याचे त्यांनी म्हंटले. हाफकींचं 226 कोटींचा बिल थकावल्याने औषधांचा तुटवडा (Pune) झाला. त्यामुळेच नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दुर्घटना घडली असल्याचाही त्यांनी सत्ताधारी पक्षावर आरोप केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.