Pimpri Chinchwad : शहरातील सर्व जलतरण तलावांचे ऑडीट करा – नाना काटे

एमपीसी न्यूज – आज कासारवाडीमधील (Pimpri Chinchwad) महापालिकेच्या येथील जलतरण तलावात पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन गॅसचा वापर केला जातो, हे करत असताना पाण्याचा व क्लोरीन गॅसचा संपर्क आल्याने गॅस गळती होवून दुर्घटना घडली. यामध्ये 22 नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरातील सर्व जलतरण तलावांचे ऑडीट करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधीपक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

या दुर्घटनेतील जखमींमध्ये नागरीकांसह, जीवरक्षक, सुरक्षा रक्षक यांचा देखील समावेश आहे, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, या गॅस गळतीमुळे झालेल्या घटनेची चौकशी करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधीतावर योग्य ती कारवाई करावी.

Pune : माफिया ललित पाटील याला ससुन रुग्णालयात दाखल करण्यासाठी दादा भुसेंनी फोन केले का? सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

तसेच भविष्यात आशा घटना घडू नयेत, यासाठी सर्व जलतरण तलावसंर्दभातील ठेकेदार, सुरक्षा एजन्सी यांना सुरक्षा ऑडीट (Pimpri Chinchwad ) बंधनकारक करावे, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहरातील महापालिकेच्या जलतरण तलाव केंद्राचे ऑडीट करावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.