Congress : कॉंग्रेसचा हमासला पाठिंबा कायम; पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेविरोधात निर्णय

एमपीसी न्यूज : इस्रायल आणि हमास यांच्यातील (Congress ) युद्धाबाबत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेविरोधात जात  पॅलेस्टाईनला समर्थन दिले आहे. रविवारी कॉँग्रेसने हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध केला होता. मात्र, सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीत (CWC) ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाने पॅलेस्टिनींना जमीन, स्वराज्य आणि स्वाभिमानाने जगण्याच्या हक्काचे समर्थन केले.

ठरावाच्या सातव्या आणि अंतिम मुद्द्यामध्ये, युद्ध थांबवून  संघर्षाला निर्माण करणाऱ्या अपरिहार्य मुद्द्यांसह वाटाघाटी करून तडजोड करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे या प्रस्तावात इस्रायल आणि त्यावरील हल्ल्याचा कॉँग्रेसने प्रस्तावात उल्लेख केला नाही.

Pimpri Chinchwad : शहरातील सर्व जलतरण तलावांचे ऑडीट करा – नाना काटे

काँग्रेसची ही भूमिका भारत सरकारच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे. या मुद्द्यावर आपण इस्रायलच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सरकारने म्हटले होते. इस्रायलवरील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून हमासच्या हल्ल्यांवर जोरदार टीका केली होती.

हमासने शनिवारी सकाळी इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यात शेकडो इस्रायलींना प्राण गमवावे लागले. प्रत्युत्तर म्हणून (Congress) इस्रायलनेही हमासवर हल्ला केला. तेव्हापासून दोघांमध्ये युद्ध सुरू आहे. परंतु, कॉँग्रेसने कायम पॅलेस्टाईन आणि हमासला आपले समर्थन दिले असून त्यांनी ही भूमिका कायम राखल्याने त्यांना सर्व स्तरातून विरोध होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.