Pune : तुम्हाला महाराष्ट्रामध्ये रहायचे आहे की नाही-अजित पवार

एमपीसी न्यूज – मागील आठवड्यात (Pune)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा सुरू झाली. त्याच दरम्यान एक संस्थेचा सर्वे आला.त्यामध्ये भाजपचे नेते विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर अजित पवार आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती देण्यात आली आहे.

त्या सर्वे बाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.त्या सर्वे बाबत  अजित पवार यांना पुण्यात पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, तुम्ही काय बोलताय किती धांदत खोट बोलत आहात,तुम्ही परवा जाहिरात बघितली नाही. मुख्यमंत्रीपदाच्या पाठिंब्याकरिता आम्हाला 26 टक्के मिळाले आहेत आणि तुम्ही काही तरीच सांगत आहे.तुम्हाला महाराष्ट्रामध्ये रहायचे आहे की नाही.असा शब्दात अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अजित पवार यांनी टोला लगावला.

Mahalunge : वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.या बैठकीत राज्यातील साखर कारखानादार आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा झाली.या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,काँग्रेस पक्षाचे आमदार विश्वजीत कदम, बाळासाहेब पाटील,भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद (Pune) साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.