Pune : गॅस एजन्सी फसवणूक प्रकरणात माजी नगरसेवक व मुलाविरुद्ध तक्रार करण्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

एमपीसी न्यूज – गॅस एजन्सीमध्ये पैसे गुंतवणूक करून ( Pune) चांगला परतावा देण्याचे आमिष देऊन 9 जणांना तब्बल 5 कोटी 53 लाख 8 हजार रुपयांची फसवणूक केल्य़ा प्रकरणी सध्या पुण्याचे  नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी व त्यांचा मुलगा मयुरेश जोशी यांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी इतर कोणाची फसवणूक झाली असल्यास त्वरीत पोलिसांशी सपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Pune : नवरात्र उत्सवात विशेष पोलीस अधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन चतुश्रुंगी पोलीसांनी केला सन्मान

याप्रकरणी मंगेश खरे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली ( Pune) आहे. आत्तापर्यंत 9 जणांनी त्यांची 5 कोटी 53 लाख 8 हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या आहेत. आरोपी मयुरेश जोशी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कोणतीही परवानगी नसताना वार्षिक 12 टक्के व्याजाची खोटी प्रमाणपत्रे फिर्यादी यांच्यासह अनेकांना दिली.

याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेने तपास हाती घेतला असून अशीच कोणाची फसवणूक झाली असेल तर त्वरीत पोलिसांशी संपर्क साधावा. येताना फिर्यादीने सोबत सर्व कागदपत्रे घेऊन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे यांच्याशी 7350087266 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.