Chinchwad : अवजड वाहनांना प्रवेश बंदीचे सूचना फलक न दिसणाऱ्या ठिकाणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी (Chinchwad ) अवजड वाहनांना ठराविक वेळेसाठी प्रवेश बंदी केली आहे. त्याची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांकडून सुरु आहे. मात्र अवजड वाहतुकीला बंदी असल्याचे सूचना फलक सहजरीत्या न दिसणाऱ्या ठिकाणी लावले गेल्याने वाहन चालकांचा गोंधळ उडत आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.

पिंपरी चिंचवड शहर परिसरात औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्येत झपाट्याने (Chinchwad ) वाढ होत आहे. शहराचा विस्तार देखील वेगाने होत आहे. चाकण, तळेगाव एमआयडीसीमध्ये तसेच तळवडे, हिंजवडी आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी कात्रज ते रावेत या राष्ट्रीय माहामार्गावरून कामगार ये-जा करीत असतात. त्याव्यतिरीक्त त्यात तळेगाव, चाकण तसेच तळवडे, हिंजवडी आयटीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या वाहनांचा अतिरिक्त भार पडत आहे.

Pune : गॅस एजन्सी फसवणूक प्रकरणात माजी नगरसेवक व मुलाविरुद्ध तक्रार करण्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

उद्योगांशी संबंधित होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे पिक अवर मध्ये वाहतूक कोंडीच्या घटना घडतात. अवजड वाहने रस्त्यावर आल्याने तसेच अरुंद रस्ते, रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यावरील अतिक्रमण, बंद पडलेले सिग्नल, वाहतूक पोलीस नसणे यामुळे देखील वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सकाळी आठ ते 11 आणि दुपारी चार ते रात्री नऊ या कालावधीत शहरातील अनेक मार्गांवर अवजड वाहतुकीला प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

याबाबतचे सूचना फलक वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी लावले आहेत. भक्ती शक्ती चौकाकडून त्रिवेणीनगर मार्गे तळवडे येथे जात असताना त्रिवेणीनगर चौकात तळवडे वाहतूक पोलिसांनी एक सूचना फलक लावला आहे. हा सूचना फलक आतील बाजूला असल्याने ठळकपणे वाहन चालकांना दिसत नाही. त्यामुळे अनेक वाहन चालक सकाळी आठ ते 11 आणि दुपारी चार ते रात्री आठ वाजताच्या कालावधीत देखील अवजड वाहने या रस्त्याने चालवतात. प्रसंगी वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिसांकडून वाहनांवर कारवाई देखील होते.

जर फलक दर्शनी भागात स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने लावला तर आम्ही या वेळेत आलोच नसतो, असा युक्तिवाद करत वाहन चालक वाहतूक पोलिसांसोबत वाद घालतात.

वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे म्हणाले, “वर्दळीच्या मार्गावर (Chinchwad ) अवजड वाहतुकीला ठराविक वेळेत बंदी केली आहे. त्याबाबत सूचना फलक लावण्यात आले आहेत. जर एखाद्या ठिकाणी सहज नजरेस न पडणाऱ्या ठिकाणी सूचना फलक असेल तर त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल.”

तळवडे वाहतूक विभागातील खालील मार्गांवर अवजड वाहनांना बंदी –

त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण ते आय टी पार्क चौक ते महिंद्रा कंपनी चाकणकडे जाणाऱ्या रोडवर तसेच चाकण कडून तळवडे आयटी पार्क मार्गे त्रिवेणीनगरकडे येणाऱ्या जड / अवजड वाहनांना सकाळी आठ ते अकरा व दुपारी चार ते नऊ पर्यंत प्रवेश बंद .

परंडवाल चौक -खंडेलवाल चौक आय टी पार्क चौक तळवडे गावठाण चिखली गावठाण-डायमंड चौक, रामकृष्णहरी चौकाकडे येणाऱ्या तसेच रामकृष्णहरी चौकाकडून आय टी पार्क चौक तळवडे गावठाण मार्गे परंडवाल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी आठ ते अकरा व दुपारी चार ते नऊ पर्यंत या वेळेत जड / अवजड वाहनांना प्रवेश बंद

डायमंड चौक ते कुदळवाडी ब्रीजकडे जाणाऱ्या व कुदळवाडी ब्रीज ते डायमंड चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर सकाळी सकाळी आठ ते अकरा व दुपारी चार ते नऊ पर्यंत वेळेत जड / अवजड वाहनांना प्रवेश बंद

कृष्णा चौक साने चौक नेवाळेवस्ती डावीकडून पिंगळे चौक- सोनवणे वस्ती ज्योतिबानगर – चौका दरम्यान जाणे-येणेच्या मार्गावर सकाळी सकाळी आठ ते अकरा व दुपारी चार ते नऊ पर्यंत जड वाहनांस प्रवेश (Chinchwad )  बंद.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.