Pune : नवरात्र उत्सवात विशेष पोलीस अधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन चतुश्रुंगी पोलीसांनी केला सन्मान

एमपीसी न्यूज –  नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी चतुश्रुंगी देवस्थान ( Pune)  येथे संपूर्ण 10 दिवसात चतुश्रुंगी मंदिरात परिसरात चोख बंदोबस्ताला सहकार्य कऱणाऱ्या विशेष पोलीस अधिकारी यांचा चतुश्रुंगी पोलिसांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सत्कार केला आहे.

यावेळी चतुश्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर,पोलीस निरिक्षक राजकुमार केंद्रे,ए पी आय संभाजी गुरव,ए पी आय संतोष कोळी,ए एस आय दिनेश गडांकुश,हवालदार राजु भिसे,पोलीस हवालदार राम खाडे, कैलास खेडेकर उपस्थित होते.

Chikhali : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन उत्साहात

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बालाजी पांढरे आणि संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख बंदोबस्ताला संस्कार प्रतिष्ठानच्या 30 सभासदांनी सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत मदत केली या दहा दिवसात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

या बंदोबस्ताचे कौतुक पुणे शहर सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी प्रत्यक्ष चतुश्रुंगी देवस्थान भेटी दरम्यान केले. या उत्सवाच्या सांगता समारंभनिमित्त पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे तसेच सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्या हस्ते प्रत्येक सभासदाला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.संस्कार प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे,अतिशय शिस्तबध्द बंदोबस्त प्रतिष्ठान सभासदांनी ( Pune)  केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.