Chikhali : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन उत्साहात

एमपीसी न्यूज – चिखली मध्ये भारत माता की जय वंदे मातरमच्या ( Chikhali ) जयघोषात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पथसंचलन उत्साहात पार पडले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस अर्थातच विजयादशमीनिमित्ताने नागेश्वर विद्यालय, चिखली नगर (देहू गट ) मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन करण्यात आले.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी चिखली आणि संभाजी नगर असे संयुक्त स्तरावर संचलन करण्यात  आले होते.  यंदा मात्र स्वतंत्र नगर स्तरावरून करण्यात आले. तीनपटीहून अधिक स्वयंसेवक या पथसंचालनामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पथसंचलन करण्यात आले. यावेळी स्वयंसेवक सदंड संपूर्ण गणवेशात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी परंपरेनुसार विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शस्त्र पूजन व पथसंचलन आयोजित करण्यात येते.

Chikhali : विरोध डावलून रिव्हर मैदान हॉर्स रायडिंगसाठी का दिले? महापालिका आयुक्त म्हणतात…

चिखली नगरचे स्वतंत्र संचलन काढणे हे मोठे आव्हान नगराने स्वीकारले आणि यशस्वी ही केले. चिखली नगरातील सर्व 9 वस्त्यांमधून स्वयंसेवक पथसंचलनासाठी उपस्थित राहिले.

त्यासाठीची संपूर्ण तयारी मागील आठवड्याभरापासून जोरात सुरु होती. एकूण 10 सांघिक नगरात घेण्यात आले. ज्यामुळे नगराचा पहिला पथसंचलन कार्यक्रम मोठ्या संख्येने यशस्वी पार पडला.

पथसंचलनाच्या समोर दोन स्वयंसेवक धारी बुलेट गाडी आणि मागे सजवलेली थार गाडी हे विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. एकूण 2.5 किलोमीटरचा प्रवास पाटील नगर, चिखलीच्या अरुंद गल्ली मधून करून नागेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात थांबला.

संचलन मार्गात नागरिक बंधूने ध्वजाचे उत्स्फुर्त पुष्पवर्षाव करून स्वागत केले. सर्व संचलन मार्गात नागरिक बंधूने आकर्षक रांगोळी काढली होती. या पथसंचलनात स्वयंसेवका बरोबरच सामाजिक आणि राजकीय मान्यवरांनी हजेरी ( Chikhali ) लावली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.