Pune : रासायनिक, जैवशास्त्रीय, रेडिओलॉजिकल आणि आण्विक बाबींविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुण्यात प्रदर्शन

एमपीसी न्यूज – संरक्षण मंत्रालयाच्या (DGQA) निर्देशानुसार, नॅशनल बोर्ड ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशनच्या (Pune) (एनबीसीबी) पुणे शाखेने बुधवारी (दि. 10) रासायनिक, जैवशास्त्रीय, रेडिओलॉजिकल आणि आण्विक (सीबीआरएन) बाबींविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी खुल्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

सीबीआरएन बाबत संरक्षणात्मक उपकरणे, सीबीआरएन घटकांमुळे झालेले प्रदूषण दूर करणारी उपकरणे, एनडीआरएफद्वारे सीबीआरएन घटकांशी संबंधित आपत्कालीन संरक्षण आणि बचाव कवायती इत्यादी या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले.

एनबीसीबीच्या पुणे शाखे व्यतिरिक्त, विक्रेते, सरकारी विभाग आणि प्रयोगशाळांनी मोठ्या संख्येने त्यांच्या वस्तू प्रदर्शनात मांडल्या होत्या. सीबीआरएन घटकांमुळे होणाऱ्या जल-प्रदुषणापासून संरक्षण, या विषयावरील प्रदर्शनात जलशक्ती मंत्रालयाचा मोठा सहभाग होता.

Alandi : आळंदीमध्ये जीओ कंपनीच्या टॅावरच्या जनरेटरला आग

सार्वजनिक क्षेत्रातील आणि विविध संरक्षण प्रशिक्षण संस्था या प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी (Pune) प्रदर्शित करण्यात आलेले संबंधित विषयावरील चित्रफिती प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांचे प्रमुख आकर्षण ठरले. सर्वसामान्य नागरिकांमध्ये रासायनिक, जैवशास्त्रीय, रेडिओलॉजिकल आणि आण्विक (सीबीआरएन) बाबींविषयी जागरूकता निर्माण करण्यामध्ये हे प्रदर्शन यशस्वी ठरले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.