Pune : कोविड केअर सेंटरसाठी खोटे पार्टनरशीप डिड सादर केल्याप्रकऱणी डॉक्टरसह चार जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर लॉकडाऊनच्या काळात हॉस्पीटलला कोविड (Pune ) सेंटरच्या वैद्यकीय सेवा परिचलनासाठी बनावट पार्टनरशिप डीड देत निवीदा मिळणावणाऱ्या पुण्यातील लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस च्या डॉक्टरसह चार जणांवर फसणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा सारा प्रकार 26 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2020 या कालावधीत घडला. याप्रकरणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचेकडे प्राप्त तक्रार देण्यात आला होता. या चौकशीत कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुवारी (दि.20) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता राजू लक्ष्मण ठाणगे ( वय 47) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस चे डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : रमजान ईद निमीत्त पुण्यातील वाहतूकीत बदल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या जम्बो कोवीड सेंटरच्या परिचलनासाठी निवीदा भरताना लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या फर्मने बनावट पार्टनरशिप डीड तयार करून हि निविदा मंजूर करून घेऊन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची फसवणूक केली. चौकशीत सारा प्रकार समोर येताच फर्मवर गुन्हा दाखल (Pune ) करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.