Pune : जैन बांधवांकडून आज पुणे बंदची हाक; झारखंड सरकारच्या निर्णयाचा करणार विरोध

एमपीसी न्यूज : झारखंड राज्य सरकारने (Pune News) जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले. राज्य सरकारच्या या निर्णयाचा जैन समाजाने विरोध केला आहे. या विरोधात संपूर्ण जैन समाजाने आज भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला पुण्यातील जैन समाज बांधवांनी पाठींबा दिला असून आज सर्व जैन बांधव आपले दुकान, व्यवसाय बंद ठेऊन या निर्णयाचा निषेध नोंदवणार असल्याचे श्री गोडवाड संघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव गणपत मेहता यांनी आवाहन केले आहे.

झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण स्थित आहे. या तीर्थक्षेत्राचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्यास जैन समाजाचा अनेक दिवसांपासून विरोध आहे. पर्यटन स्थळे आणि वन्यजीव अभयारण्य यासारख्या गोष्टी करण्यासाठी सरकारने जारी केलेली अधिसूचना धार्मिक श्रद्धा दुखावणारी आहे. कोणताही सुसंस्कृत समाज अशा योजना स्वीकारणार नाही. सरकारने सम्मेत शिखरजीसह देशातील सर्व धार्मिक स्थळे पवित्र स्थळे म्हणून घोषित करून तेथे दारू, मांसाहार व इतर व्यसनांवर बंदी घालावी. पवित्र स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणे चुकीचे असून सम्मेत शिखरजीला पर्यटन स्थळ करण्याचा (Pune News) प्रस्ताव मागे घ्यावा, अन्यथा टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जैन समाजाने दिला आहे.

Alandi : आळंदी देवस्थानचे माजी व्यवस्थापक बंडोपंत कुलकर्णी यांचे निधन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.