Pune : कसबा मतदारसंघात अनेक अष्टपैलू खेळाडू घडतील – चंद्रशेखर बावनकुळे

एमपीसी न्यूज – कसबा मतदारसंघातून देखील (Pune)अनेक अष्टपैलू खेळाडू या माध्यमातून घडतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जात असून युवक हेच आपल्या देशाची खरी शक्ती आहेत. देशाचे विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून कायम युवक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो.

Talegaon Dabhade : स्पर्धेच्या युगात मेहनतीला पर्याय नाही – आमदार सुनील शेळके

याच पार्श्वभूमीवर देशभरात “नमो चषका”चे आयोजन(Pune) करण्यात येत असून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते कसबा मतदारसंघात महाराष्ट्रातील नमो चषक स्पर्धेच्या नोंदणीचे उद्घाटन करण्यात आले. शनिवार पेठ येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सरकारच्या योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी अटल सेवा केंद्र आणि निलेश खडके यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले. यावेळी दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारकडून (Pune)कायम युवक आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. महाराष्ट्रात देखील प्रत्येक मतदारसंघात खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नमो चषकाचे आयोजन करण्यात येत आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी पांडे, मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह मतदारसंघातील सर्व आघाड्यांचे अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.