Pune : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत; कोयत्याने वार करून एकाची निर्घृण हत्या

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील मुंढवा परिसरात पुन्हा (Pune ) एकदा कोयता यांच्या गुंडांनी दहशत माजवली. घराजवळ नशा करण्यासाठी बसलेल्या गुंडांना हटकल्याने त्यांनी कोयत्याने वार करून एका व्यक्तीचा खून केला. मुंढव्यातील केशवनगर परिसरात ही घटना घडली.
रवींद्र दिगंबर गायकवाड (वय 59, रा. केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केशवनगर येथील श्रीकृपा सोसायटीत रवींद्र गायकवाड यांचे घर आहे. तर घरापासून काही अंतरावर त्यांचा गाई म्हशींचा गोठा आहे. गोठा समोर असलेल्या मोकळ्या जागेत काही तरुण नशा करत बसले होते. त्यावेळी गायकवाड यांनी या तरुणांना हटकले आणि येथे बसू नका असे सांगितले.
याचा राग आल्याने या तरुणांनी गायकवाड यांना शिवीगाळ केली आणि निघून गेले.  काही वेळाने टोळके कोयते घेऊन आले.त्यांनी पुन्हा गायकवाड यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर (Pune ) आरोपी दहशत माजवून पसार झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.