Pune : एम. जे चषक तिसऱ्या हॉकी स्पर्धेत मध्य रेल्वे आणि के पी इलेव्हन यांचा दणदणीत विजय

एमपीसी न्यूज : पीसीएमसी हॉकी अकादमी, मध्य रेल्वे पुणे (Pune) आणि क्रीडा प्रबोधिनी यांनी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आयोजित केलेल्या एम जे चषक तिसऱ्या निमंत्रित हॉकी स्पर्धेतील (पुरुष आणि महिला) आपापल्या पहिल्या गटातील सामन्यात विजय मिळवला आणि पूर्ण गुण मिळवले.

धनराज पिल्ले फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हॉकी महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली आणि एक्सलन्सी हॉकी अकादमीने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

पीसीएमसी हॉकी अकादमीने साखळी अ गटामध्ये यजमान एक्सलन्सी हॉकी अकादमीचा 0-1 असा पिछाडीवरून 3-1 असा पराभव केला. पेनल्टी स्ट्रोकवर सौरभ पाटील (35वा), पेनल्टी कॉर्नरवर जय काळे (38वा) आणि अभिषेक माने (57वा) यांचा प्रत्येकी एक गोल पीसीएमसीच्या विजयासाठी पुरेसा ठरला. एक्सलन्सी हॉकी अकादमीसाठी नवज्योत सिंग (सहावे मिनिट) पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करून संघाला आघाडी मिळवून दिली.

मध्य रेल्वे पुणेने सात खेळाडूंसह खेळणाऱ्या किड्स इलेव्हनचा 10-0 असा पराभव करीत एकतर्फी विजयाची नोंद केली. रुबेन केदारी (17 वे, 22 वे, 37 वे) याने तीन, भूषण ढेरे (दुसरे,आठवे ) आणि अवधूत सोलनकर (सातवे, 33वे) आणि विशाल पिल्ले (47 वे, 55वे) यांनी प्रत्येकी दोन गोल केले आणि विनोद निंभोरे (19वे) यांनी गोल केले.

साखळी क गटामध्ये क्रीडा प्रबोधिनीने फ्रेंड्स युनियनचा 10-1 असा धुव्वा उडविला. विजय संघाकडून प्रज्वल मोहरकर (8वे, 9वे, 37वे, 48वे) याने चार गोल केले. गोल करणाऱ्यांमध्ये राहुल शिंदे (21वे, 33वे), धैर्यशील जाधव (3रे), योगेश बोरकर (13वे), रोहन पाटील (43वे) आणि सचिन राजगडे (56वे) आहेत. फ्रेंड युनियनकडून रेहान शेख (25वे) याने एकमेव गोल नोंदविला.

निकाल

एसआरपीएफ, पुणे वि.वि रोव्हर्स अकादमीकडून पुढे चाल (Pune)

पीसीएमसी हॉकी अकादमी: 3 (सौरभ पाटील 35वे – जय काळे 38वे, अभिषेक माने 57वे) विजयीविरुद्ध एक्सलन्सी हॉकी अकादमी: 1 (नवज्योत सिंग 6वे )

मध्य रेल्वे पुणे: 10 (भूषण ढेरे 2रे, 8वे; अवधुत सोलनकर 7वे, 33वे; रूबेन केदारी 17वे, 22वे, 37वे; विनोद निंभोरे 19वे; विशाल पिल्ले 47वे, 55वे)

क्रीडा प्रबोधिनी: 10 (धैर्यशील जाधव 3रे; प्रज्वल मोहरकर 8वे, 9वे, 37वे, 48वे; योगेश बोरकर 13वे; राहुल शिंदे 21वे, 33वे; रोहन पाटील 43वे ; सचिन राजगडे 56वे) वि. वि‌ फ्रेंड्स युनियन (रेहान शेख दि. 25वे).
पूना हॉकी अकादमी वि.वि. एफसीआयकडून पुढे चाल

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.