Chinchwad : विसरलेल्या एटीएम कार्डवरील माहितीच्या आधारे 44 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एटीएम सेंटर मध्ये कार्ड विसरले असता अज्ञात व्यक्तीने त्या कार्डवरील माहितीच्या (chinchwad) आधारे युपीआयद्वारे व्यवहार करून 44 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना 12 डिसेंबर रोजी सकाळी लिंक रोड, चिंचवड येथे घडली.

अशोक नागोराव ढोले (वय 67, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : एम. जे चषक तिसऱ्या हॉकी स्पर्धेत मध्य रेल्वे आणि के पी इलेव्हन यांचा दणदणीत विजय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढोले हे 12 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास लिंक रोड येथील एका एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले. पैसे काढल्यानंतर त्यांचे एटीएम कार्ड मशीन मध्ये विसरले. त्या कार्डवरील माहितीच्या आधारे अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या (chinchwad) खात्यावरून आठ वेळा युपीआयद्वारे व्यवहार करत 44 हजार 297 रुपये काढून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.