Chinchwad : सदनिका विकण्याच्या बहाण्याने 12 लाख 50 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सदनिका विकण्याच्या बहाण्याने 25 लाख रुपये घेऊन त्यातील 12 लाख 50 हजार रुपये (Chinchwad) परत न करता एकाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सन 2018 ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीत चिंचवड येथे घडला.

सुरज विश्वनाथ पाटील (वय 32, रा. कामठी खुर्द, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुधीर विष्णू वाडेकर (वय 58, रा. विकासनगर, किवळे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Chinchwad : विसरलेल्या एटीएम कार्डवरील माहितीच्या आधारे 44 हजारांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चिंचवड मधील समृद्धी वर्षा बिल्डींग मधील एक सदनिका फिर्यादी यांना देतो असे सांगून सदनिका घेण्यासाठी फिर्यादीकडून 25 लाख रुपये घेतले. त्यानंतर ती सदनिका आरोपीने फिर्यादी यांच्या परस्पर रणजीत अजित सावंत (Chinchwad) आणि अस्मिता रणजीत सावंत यांच्या नावावर करून दिली.

हा प्रकार समजल्यानंतर फिर्यादी यांनी पैसे परत मागितले असता 12 लाख 50 हजार रुपये फिर्यादीस परत देऊन उर्वरित 12 लाख 50 हजार रुपये न देता फिर्यादीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.