Pune : चांद्रयान 3 मोहीमेच्या यशासाठी सारसबाग गणपती मंदिरात शिवसेनेकडून महाआरती आणि होमहवन

एमपीसी न्यूज – चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आज 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. या मोहिमेकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. चांद्रयान 3 यशस्वीरीत्या चंद्रावर उतरावे  यासाठी देशातील अनेक भागात होमहवन,नमाज पठण केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सारसबागेतील श्री सिद्धिविनायक मंदिरात शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाआरती आणि होमहवन करून गणरायाकडे चांद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

Pune : महागड्या कारचा डाटा चोरी करून डुप्लीकेट चावीमध्ये घेत गाड्यांची अगदी आरामात चोरी करणारी टोळी गजाआड

यावेळी शहरप्रमुख नाना भानगिरे म्हणाले की, चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वीपणे पार पडावी याकरिता आम्ही सर्व शिवसैनिकांनी गणराया चरणी प्रार्थना केली आहे. तसेच आगामी काळात या मोहिमेमुळे अनेक तरुण शास्त्रज्ञ घडो, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.