Chandrayan 3 : चांद्रयान 3चं प्रज्ञान रोव्हर चंद्रावर कसं उतरलं; इसरोने व्हिडीओ शेअर केला

एमपीसी न्यूज – भारतीयांच्या आशाआकांक्षांसह (Chandrayan 3) तब्बल एक हजार 800 किलो वजन घेऊन 14 जुलै रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने झेपावले. हे चांद्रयान इसरोने जाहीर केलेल्या वेळेवर बुधवारी (दि. 23) सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रावर अवतरले. या यशामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. इसरोने विक्रम लॅंडर मधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

https://twitter.com/isro/status/1694945669721776263?s=20

विक्रमच्या यशस्वी अवतरणानंतर काही तासांनी त्यात असलेला प्रज्ञान रोव्हर बाहेर पडला. रोव्हरमध्ये कॅमेरा आणि अन्य उपकरणे आहेत. त्याद्वारे चंद्रावरील माती आणि वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. प्रज्ञान रोव्हर चंद्रावरील एक दिवस म्हणजेच पृथ्वीवरील 14 दिवसात हे काम करणार आहे.

PCMC : तीनचाकी वाहनांपैकी किमान 50 टक्के तीन चाकी वाहने ही इलेक्ट्रिक असावीत

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अनेक प्रचंड मोठी विवरे आहेत. त्यामुळे त्या भागात उतरणे आतापर्यंत एकाही देशाला शक्य झालेले नव्हते. या विवरांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ असल्याचे पुरावे संशोधकांना मिळाले आहेत. या बर्फाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आणि तो बाहेर काढून वापरणे शक्य झाले तर भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी त्याचा खूप मोठा उपयोग होणार आहे.

https://twitter.com/isro/status/1694360664675127726?s=20

बर्फ वितळवून पिण्यासाठी तसेच उपकरणे थंड करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, असा संशोधकांना अंदाज आहे. पाण्याचे विघटन करून इंधन म्हणून हायड्रोजन आणि श्वसनासाठी ऑक्सिजनची निर्मिती करता (Chandrayan 3) येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.