Pune : चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वी उतरल्यानंतर पुण्यात विद्यार्थिनी ढोल ताशा वाजून केला जल्लोष

एमपीसी न्यूज – संपूर्ण जगाचे चांद्रयान 3 कडे लक्ष लागून राहिले होते.ते चांद्रयान 3 आज सायंकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी चंद्रावर यशस्वी उतरल्यानंतर देशभरातील नागरिक एकच जल्लोष करित आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील (Pune) टिळक रोडवरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जेआरव्हीजीटीआय आणि न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशा वाजवित एकच जल्लोष केला.

Moshi : ‘सिल्व्हर-9’ सोसायटीलगतचे कचरा संकलन केंद्राचे काम अखेर थांबविवले!

जसे जसे अंतर आणि वेग कमी होत होता. तसे तसे प्रेक्षकांची उत्कंठा वाढत होती. टेरर 17 चा थरार अनुभवला, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या गेल्या. जल्लोश पूर्ण वातावरण होते. तिरंगा डौलात फडकवत होते. चांद्रयान 3 ची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे,कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक खेमराज रणपिसे, मिलिंद कांबळे, प्रबंधक डॉ. सविता केळकर, जेआरव्हीजीटीआयचे संचालक प्रशांत गोखले, प्रा. प्राजक्ता प्रधान, मुख्याध्यापिका सुनिता राव, शास्त्रज्ञ पराग महाजनी, विनायक रामदासी यांची प्रमुख उपस्थिती होते.

चला मुलांनो आज पाहू या शाळा चांदोबा गुरुजींची, चंदाराणी, खोया खोया चांद, चंदारे चंदारे बैठेंगे बाते करेंगे, चांद को क्या मालुम चाहता है उसे कोई चकोर, चलो दिलदार चलो, जिंगल बेल या गाण्यांच्या माध्यमातून चंद्राचा आजवरचा इतिहास उलगडून दाखवला.

गॅलिलिओचा दुर्बिण शोध, केपलरचे नियम, चंद्रावर जाणारे अंतराळवीर आणि विविध देशांची याने, नील आरमस्ट्राँग याचे चंद्रावरील पहिले पाऊल, त्यानंतरच्या चंद्रमोहिमा, त्यांच्या समोरील आव्हाने, भारताची चांद्रयान 1 पासून आजपर्यंतची चंद्र मोहीम याची माहिती दिली.सर्व अंतराळयाने विषववृता जवळ उतरली.दक्षिण गोलार्धात यान उतरवणे तांत्रिक दृष्ट्या अवघड आणि आव्हानात्मक असल्याचे महाजनी यांनी सांगितले.भारतात फक्त अंधश्रद्धा नाही.विज्ञान आहे.

वैज्ञानिक एकत्र आहेत. पूर्णपणे आपल्या बळावर चांद्रयान उतरावले आहे याचा अभिमान असल्याचे महाजनी यांनी सांगितले. भारत दक्षिण गोलार्धात यान उतरणार हा मान कोणाला मिळणार, लूना 25 शेवटच्या क्षणी गडबड झाली, निकोप स्पर्धा आहे.त्यांचे यान लवकर गेले, ऑटोमॅटिक लँडिंग, संगणक प्रणाली आणि शेवटच्या क्षणी दिल्या जाणाऱ्या सूचना, यानावरील सेन्सर्चे रिअल टाइम संदेश हे प्री विकसित आहेत.

हे कार्यक्रम बदलू शकतो पण त्याला उशीर लागेल, एक सेकंदाचा काळ येथे मोठा असतो, कक्षा बदलली जाते, लुना 25 अपयशी ठरली असे महाजनी यांनी सांगितले.चंद्राच्या संदर्भातील पौराणिक कथा,चंद्राची खगोलशास्त्रीय माहिती, चंद्राच्या कविता सादरीकरण, चांद्रयान 3 मोहीम माहिती, चांद्रयानाची प्रतिकृती, चांद्रयान मोहीम शेवटच्या टप्प्याचे थेट प्रक्षेपण, शेवटी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.