Pune : महागड्या कारचा डाटा चोरी करून डुप्लीकेट चावीमध्ये घेत गाड्यांची अगदी आरामात चोरी करणारी टोळी गजाआड

एमपीसी न्यूज – सध्या महागड्या गाड्यांना स्मार्ट लॉक व स्मार्ट की सिस्टीम ( Pune) आली आहे. ज्यामुळे ही गाडी ओरीजनल चावी शिवाय चालू करणे अवघड जाते. मात्र चोरांनी एक पाऊल पुढे टाकत गाडी कंपनीलाही हादरवून सोडणारी शक्कल वापरत त्यांची सिक्युरिटी सीस्टीमच मोडीत काढली आहे.  त्यांनी एका इलेक्ट्रीक मशीनद्वारे गाडीतील डाटा डुप्लिकेट चावीमध्ये ट्रान्स्फर करत आलिशान व स्मार्ट कार देखील आरामात चोरल्या आहेत.

याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा 2 च्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने केली आहे. यामध्ये पोलिसांनी राजेश राधेशाम पंडित (वय 37), मनोज महेंद्र परीहार (वय 42), इस्माईल शब्बीर अहमद खान (वय 41), गोरखनाथ उर्फ पप्पू साळवे (वय 41)  या चार जणांना अटक केली असून साळवे हा केवळ महाराष्ट्रातील असून बाकी आरोपी हे उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत.

 

Pune : महापालिकेच्या गाडीवर दररोज काम देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वाहन वाटपकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्यात 19 लाख रुपयांची फॉर्च्यूनर कार चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली ( Pune) होती. मात्र स्मार्ट लॉक सीस्टीम असणारी कार चोरी झाली कशी याने सारेच बुचकळ्यात पडले होते. यासाठी पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे धुंडाळून काढत तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढला. पोलिसांनी आरोपींना  लोणी काळभोर येथूल कुंजीरवाडी फाटा येथून अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेली कार व इतर साहित्य असा एकूण 20 लाख 80 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.त्यांच्यावरील लोणीकंद व नाशिक येथील गंगापूर पोलीस ठाण्यातील दोन गाडी चोरीचे गुन्हे या तपासात उघड झाले.

अशी केली जात होती चोरी 

सध्या फॉर्च्यूनर सारख्या महागड्या कार कंपनी स्मार्ट की ग्राहकांना देत आहेत ज्यामुळे ओरिजनल चावी शिवाय कार चालु करणे ( Pune) निव्वळ अशक्य मानले जात होते. यावर चोरांनी नामी शक्कल लावली. यातील पंडित, परिहार व खन यांना दिल्ली व नोयडा परिसरातील अशा महागड्या कार चोरी करण्याचा अनुभव होता. त्यांनी पुण्यातही अशा गाड्या हेरायला सुरुवात केली.

ते परिसरात फिरून आधी अशा गाड्यांची रेकी करत, स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने गाडीची काच फोडून ते त्यांच्याकडील 100 एक्स टुल डुप्लिकेट चावी बनविण्याचे एक्सपॅड मशीन गाडीतील वायरींगला जोडत. याने काय होई तर गाडीचा सॉफ्ट डाटा ट्रान्सफर करून घेता येई.

प्रोग्राम कॉपी झाला की ते तो डाटा मशीनला ओबीडी 16 कॉड जोडून ट्रान्फर करून घेत. यामुळे डुप्लिकेट चावीमध्ये गाडीचा सर्व सॉफ्ट डाटा आला की या चावीच्या सहाय्याने ते गाडी आरामत चोरी करत होते. त्यानंतर ती गाडी डुप्लीकेट नंबर लावून स्मार्ट कार्ड तयार करत या गाड्या गुजरात येथे गहाण स्वरुपात ठेवल्या जात, अशा कबुली आरोपींनी पोलिस तपासात दिलीय. ज्यामुळे पोलीस ही काही काळ चक्रावून गेले होते.

आरोपींनी 10 दिवसांपूर्वी नाशिक येथून एक टोयोटा कार चोरून राजस्थान येथे दिल्याचेही तपासात कबुल केले. मात्र या चोरीमुळे कंपनी जी लॉक सिस्टीम तयार करत आहेत. त्यांनाही या चोरांनी आरामत ( Pune) छेद दिल्याचे समोर आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.