Pune : महापालिकेच्या गाडीवर दररोज काम देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वाहन वाटपकाला अटक

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या गाडीवर दररोज काम देण्यासाठी कंत्राटदाराकडून 4 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या स्टार्टर (वाहन वाटप) ला अटक केली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.22) केली आहे.

Chandrayaan 3 : भारताचा ‘विक्रम’ चंद्रावर उतरण्यास पूर्णपणे सज्ज

पांडुरंग साधू लोणकर (वय 57) पद – स्टार्टर ( वाहन वाटप ) (वर्ग-3), नेमणूक  – पुणे मनपा, व्हेईकल डेपो, गुलटेकडी, पुणे. असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे हे खाजगी कंत्राटी वाहन चालक आहेत. यावेळी आरोपी पांडुरंग साधू लोणकर यांनी तक्रारदार यांना मनपाच्या गाडीवर दररोज काम  नेमून देण्याकरिता 4 हजार रुपयांची लाच मागितली. यावरून 16 ऑगस्ट रोजी फिर्यादी यांनी  तक्रार दिली होती.

त्यानुसार मंगळवारी स्वारगेट येथे चहाच्या टपरीवर सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.