ACB Trap : जमिनीची सात बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी मागितली 80 हजारांची लाच

एमपीसी न्यूज – खरेदी केलेल्या जमिनीची सात बारा उताऱ्यावर नोंद तसेच फेरफार मंजूर करण्यासाठी मंडल अधिकाऱ्याच्या नावाने 80 हजारांची लाच(ACB Trap) मागितली. याप्रकरणी एका खासगी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्विजय सुदाम नाईकनवरे (रा. येरवडा, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 65 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी हवेली तालुक्यातील कोलवडी येथे जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीची सात बारा उताऱ्याची नोंद / फेरफार मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात प्रकरण आहे. हे काम करण्यासाठी खासगी व्यक्ती विजय नाईकनवरे याने मंडल अधिकाऱ्यासाठी फिर्यादीकडे 80 हजारांची लाच (ACB Trap) मागितली.

Mahalunge : महिंद्रा कंपनीसमोर कार कॅरिअर कंटेनरला आग

याबाबत फिर्यादी यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने 15 फेब्रुवारी रोजी सापळा लावला असता त्यात खासगी व्यक्तीने मंडल अधिकाऱ्यासाठी 80 हजारांची मागणी केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 31 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.