Pune : लाच घेण्यास प्रवृत्त करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

एमपीसी न्यूज –  गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांना (Pune) पैसे द्यावे लागतील, असे सांगून महिलेकडून लाच स्वीकारणाऱ्या वकिलाला तसेच लाच घेण्यास प्रवृत्त  करणाऱ्या पुणे पोलिसांतील सहाय्यक फौजदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
गोपाळ हरिश्चंद्र पवार असे निलंबित सहायक फौजदराचे नाव आहे.

 

Chinchwad : ‘परीक्षेला सामोरे जाताना’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन

पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या दोघा मित्रांना चौकशीसाठी दोन जानेवारी रोजी शास्त्रीनगर पोलिस चौकीत आणले होते. त्यावेळी वकील सुमीत नामदेवराव गायकवाड (वय 25, रा. आंबेगाव पठार) यांनी महिलेसह तिच्या मित्रांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांसोबत तडजोड करतो. त्यासाठी पोलिसांना पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.यासाठी पवार याने वकिलाला प्रवृत्त केले होते.
त्यानुसार महिलेसह तिच्या मित्रांनी गायकवाड यांना 1 लाख 55 हजार रुपये दिले. परंतु उर्वरित रक्कम पोलिसांना दिल्याशिवाय पुढील काम होणार नाही, असे या वकिलाने सांगितले. त्यानंतर महिलेने वकिलास 20 हजार रुपये ऑनलाइन पाठविले. परंतु याबाबत महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली. त्यानंतर ‘एसीबी’ने गायकवाडविरुध्द गुन्हा दाखल केला (Pune) होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.