Chinchwad : ‘परीक्षेला सामोरे जाताना’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन

एमपीसी न्यूज – दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या (Chinchwad) परीक्षेसाठी मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी चिंचवड येथे ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर शैक्षणिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 21) सकाळी दहा वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे.

Pune : दो धागे श्रध्दा के उपक्रमांतर्गत पुण्यातून श्रीरामांसाठी  वस्त्र व माता सीतेसाठी साडी अयोध्येला रवाना

 

चिंचवड येथील ज्ञानामृत कोचिंग क्लासेसच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. फेब्रुवारी, मार्च मध्ये दहावी, बारावीच्या वार्षिक परीक्षा होणार आहेत. दहावी, बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असतो. योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासातील चिकाटीच्या जोरावर विद्यार्थी भविष्यातील संधींना गवसणी घालत असतात.

नामवंत शिक्षण तज्ञ अ. ल. देशमुख यांचे ‘एसएससी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना एक संवाद’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर समुपदेशक तथा शिक्षण तज्ञ अनिल गुंजाळ हे ‘चला आनंदाने जगूया अर्थात ताण तणाव मुक्त जीवन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मराठी अध्यापक संघ पुणेचे अध्यक्ष नाना शिवले कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.
इंग्रजी, मराठी आणि सेमी बोर्ड परीक्षेच्या तयारीबाबत कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. शहरातील सर्व दहावी, बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक हनुमंत हाके यांनी केले (Chinchwad) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.