Pune : दो धागे श्रध्दा के उपक्रमांतर्गत पुण्यातून श्रीरामांसाठी  वस्त्र व माता सीतेसाठी साडी अयोध्येला रवाना

एमपीसी न्यूज –  देशातील प्रत्येक महत्वाच्या ( Pune) मोहिमेत पुणेकरांचा  मोठा सहभाग असतो. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. असाच उपक्रम वाघोली येथील सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्सच्या वतीने  दो धागे श्रध्दा के राबवित प्रभू श्रीरामांसाठी वस्त्र आणि माता सीतेसाठी साडी विणण्यात आली असून विधीवत पूजा अर्चना करून अयोध्येकडे रवाना करण्यात आली.

Kivale : मुंबई बेंगलोर महामार्गावर रुग्णवाहिका पलटली

सुमारे  12 हजार ते 13 हजार पुणेकरांच्या सहभागातून हे वस्त्र विणण्यात आले असल्याची माहिती राजाराम अगरवाल, भरत अगरवाल, किशोर मित्तल, रुचिका मित्तल, रितेश मित्तल, निलेश अगरवाल यांनी दिली.दो धागे श्रध्दा के  हा उपक्रम 6 ते 15 जानेवारी दरम्यान राबविण्यात आला होता.   या उपक्रमाअंतर्गत हे वस्त्र विणण्यात आले होते.

 त्यासाठी हातमाग कारागिर देखील ठेवण्यात आले होते. तसेच पुणेकरांना श्री रामासाठी तयार करण्यात येणारे वस्त्र विणण्याची संधी ही यावेळी उपलब्ध करुन दिली होती.  या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकाला हातमागावर दोन धागे विणण्याची संधी ( Pune) मिळाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.