Bopkhel : टॉवरच्या अडथळ्यामुळे 100 काेटींच्या पुलाची रखडपट्टी

एमपीसी न्यूज – बोपखेल व खडकीला जोडणाऱ्या  पुलाचे काम ( Bopkhel) अतिशय संथगतीने सुरू आहे. पूलाच्या कामासाठी तब्बल 100 काेटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. या पुलाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून उच्चदाब विद्युत वाहक तारांच्या एका टॉवरच्या अडथळ्यामुळे 10 टक्के काम पूर्ण करण्यास महापालिकेला अपयश आले आहे. टॉवरच्या स्थलांतरासाठी बोपखेल येथील खासगी जागा ताब्यात येत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.

Pune : लाच घेण्यास प्रवृत्त करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगने (सीएमई) 13 मे 2015 ला बोपखेल ते दापोडी हा नागरी रस्ता बंद केला. नागरिकांना नाईलाजास्तव दिघी, विश्रांतवाडी मार्गे पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका नागरिकांसाठी बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर 1 हजार 866 मीटर म्हणजे सुमारे 2 किलोमीटर अंतराचा पुल बांधत आहे. याचे काम  पूल व जोडरस्त्याचे काम टी ॲण्ड टी इन्फ्रा कंपनी करीत आहे.

Chinchwad : ‘परीक्षेला सामोरे जाताना’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन

न्यायालयीन प्रक्रिया, संरक्षण विभागाकडून जागा ताब्यात येण्यास विलंब आदी कारणांमुळे या पुलाचे काम रखडले होते. बोपखेलच्या बाजूने काम पूर्ण झाल्यानंतर संरक्षण विभागाच्या खडकीकडील कामास 2 ऑक्टोबर 2021 ला परवानगी मिळाली. त्यानंतर काम सुरू करण्यात आले.

512 आर्मी बेस वर्कशॉप, ॲम्युनिशन फॅक्टरी तसेच, संरक्षण विभागाच्या इतर आस्थापनांच्या जवळून हा पूल जात असल्याने सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूस पाच मीटर उंचीची सीमा भिंत उभारली आहे. त्यावर 1.5 मीटर उंचीचे व्हीजन बॅरिकेट बसविण्यात येत आहेत. पुलाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे.

जागा ताब्यात घेणे, पुलाचे काम, टॉवर हटविणे, इतर कामे आदींसाठी तब्बल 100 कोटींचा खर्च महापालिकेने केला आहे. नदी पात्र, लष्कराचा रेल्वे मार्ग, वन क्षेत्र, रस्ता व विविध संरक्षण विभागाच्या भूखंडावरून पुल जातो. रस्त्यांची रुंदी 8 मीटर असून दोन लेनचा मार्ग आहे. पुलावर पादचाऱ्यांसाठी पदपथ नाही. केवळ दुचाकी, तीन व चारचाकीसाठी वाहनांना पुलाचा वापर करता येणार आहे. पीएमपीएलची बस वाहतूकही येथून होणार नाही.

नागरिकांना मारावा लागतोय 15 किलो मीटरचा वळसा
2015 मध्ये दापोडीतील सीएमईने बोपखेलवासीयांचा मार्ग बंद केला. याविरोधात मोठे जनआंदोलनही झाले होते. मात्र, सुरक्षेचा महत्वाचा मुद्दा असल्याने हा मार्ग सुरू न होता कायमचा बंद झाला. त्यामुळे बोपखेलवासीयांना पिंपरी, दापोडी ये-जा करण्यासाठी दिघीतून म्हणजे तब्बल 15 किलो मीटरचा वळसा मारावा लागत आहे. एवढ्या मोठ्या अंतरामुळे गेल्या नऊ वर्षांपासून बोपखेलवासीय त्रस्त ( Bopkhel) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.